Join us

चांदिवलीत वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:48 IST

पवई परिसरात चांदिवलीमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने आत्महत्या केली.

मुंबई : पवई परिसरात चांदिवलीमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून उडी मारून तिने आयुष्य संपविले. लिफ्टमधून त्यांचा मृतदेह अग्निशमन दलाने खाली उतरविला. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. लक्ष्मी राऊत असे या मृत महिलेचे नाव आहे.मृत महिला पती, मुलगा आणि सुनेसोबत ते पवईतील रहेजा विहार कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास राऊत यांनी राहत्या घराच्या खिडकीतून उडी मारली.घटना घडली, तेव्हा कुटुंबातील सदस्य झोपून उठले होते. याबाबत इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितले. त्यानंतर, पवई पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राऊत यांचा मृतदेह लिफ्टच्या पॅसेजमध्ये सातव्या मजल्यावर पडला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह काढून, नंतर शवविच्छेदनासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला.