Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो फोडून लाखोंचा माल लंपास

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

टेम्पो फोडून लाखोंचा माल लंपास

टेम्पो फोडून लाखोंचा माल लंपास

घाटकोपर: रस्त्यालगत उभा असलेला टेम्पोची काच तोडून लाखो रुपयांचा माल लंपास झाल्याची घटना बुधवारी रात्री घाटकोपर येथे घडली. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात राहणारा कमलेश गुप्ता याचा होलसेल किराणा मालाचा व्यवसाय आहे. चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, भांडूप या परिसरात तो दुकानदारांना होलसेल भावात सिगारेट, चॉकलेटस आणि इतर सामान देतो. सामानाची डिलेव्हरी करुन आल्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस रोड लगत तो टेम्पो पार्क करतो. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी याठिकाणी टेम्पो पार्क केला होता. मात्र, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याच्या टेम्पोची काच फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी टेम्पोमधून काही रोख रक्कम आणि काही सामान असा एकूण १ लाखांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. काही वेळानंतर कमलेश टेम्पोकडे आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. (प्रतिनिधी)