मुंबई : आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहकारी अधिकारी, अंमलदारांशी सौजन्य व सभ्यतेने वागावे, अन्यथा त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिकाºयांना दिला आहे. विशेषत: महिला अधिकारी, पोलिसांशी संभाषण करताना विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना दिली आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अपर आयुक्त, उपायुक्त, उपअधीक्षक, वरिष्ठ निरीक्षक हे आपल्या कनिष्ठ सहकाºयांशी संभाषण करताना, अधिकार गाजवीत मग्रुरी, अरेरावी, शिवराळ भाषा वापरतात. विशेषत: महिला अधिकारी, कर्मचाºयांशी अश्लील व शिवराळ भाषा वापरतात. त्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळूनही शिस्तीच्या बडगा व आणखी त्रास होण्याच्या भीतीमुळे उघडपणे तक्रार करीत नाहीत.
महिला पोलिसांशी सभ्यतेने बोला, अन्यथा कारवाई - पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:21 IST