Join us
Daily Top 2Weekly Top 5

हजेरी लावून २६७ बेस्ट कर्मचारी पसार

By admin | Updated: January 9, 2016 02:36 IST

एका सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला जाता यावे, म्हणून बेस्ट उपक्रमातील तब्बल २६७ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब बेस्ट समितीमध्ये

मुंबई : एका सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला जाता यावे, म्हणून बेस्ट उपक्रमातील तब्बल २६७ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब बेस्ट समितीमध्ये आज उजेडात आली़ हजेरी लावून कर्मचारी या कार्यक्रमासाठी पसार झाल्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत़ चर्चगेट येथील के़सी़ महाविद्यालयात झालेल्या एका सहकारी संस्थेच्या बैठकीला हे कर्मचारी गेले होते़ ही बेस्ट उपक्रमाशी फसवणूक असल्याची नाराजी बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केली़ या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केली़, तर बेस्टमध्ये शिस्त आणण्याची सूचना काँग्रेसचे रवी राजा यांनी केली़ या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाईचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी या वेळी दिले़