Join us

मैत्रीचा फायदा घेतोय अक्षय?

By admin | Updated: June 5, 2014 01:06 IST

दहशतवादाविरोधी काम करणा:या स्पेशल एजंटवर आधारित असलेल्या ‘हॉलीडे’ या चित्रपटात अक्षय कुमार एका मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत आहे.

दहशतवादाविरोधी काम करणा:या स्पेशल एजंटवर आधारित असलेल्या ‘हॉलीडे’ या चित्रपटात अक्षय कुमार एका मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. चित्रपटात हा मिलिटरी ऑफिसर सुट्टीवर असतो, तेव्हाच त्याला एका षड्यंत्रचा सुगावा लागतो. या चित्रपटात अक्षयसोबत सोनाक्षीही मुख्य भूमिके त आाहे. यापूर्वीच्या चित्रपटात सोनाक्षीच्या वाटय़ाला फारसे महत्त्वाचे रोल आले नाहीत. सोनाक्षीनेही यापुढे असे कमी महत्त्वाचे रोल न करण्याचा पण घेतला होता. अक्षयसाठी मात्र तिला तिचीच प्रतिज्ञा मोडावी लागली. कारण ‘हॉलीडे’मध्ये सोनाक्षीचे फारच कमी आणि बिन महत्त्वाचे सीन्स आहेत. अक्षय सोनाक्षी यांच्यात चांगली मैत्री आहे. अक्षयच्या एका फोनवर सोनाक्षी त्याच्या चित्रपटात काम करायला तयार होते; पण या चांगुलपणाचा अक्षय फायदा तर घेत नाहीये ना अशी शंका येते.