पाच तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
सोलापूर : लाल रंगाच्या पल्सर कंपनीच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्याला हिसका देत पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. सात रस्ता भागातील दर्बी क्लॉथ सेंटरसमोर शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता चोरट्याने हा प्रकार केला.
पाच तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले
सोलापूर : लाल रंगाच्या पल्सर कंपनीच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्याला हिसका देत पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. सात रस्ता भागातील दर्बी क्लॉथ सेंटरसमोर शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता चोरट्याने हा प्रकार केला.रमादेवी यादगिरी इगा (वय ५२, रा. पारिजात अपार्टमेंट, सोलापूर) या आपल्या नातीला सोबत घेऊन घराकडे पायी निघाल्या होत्या. मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवले. ज्याने मंगळसूत्र पळवले, त्याच्या डोक्यावर लाल रंगाची टोपी असल्याचे रमादेवी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सपोनि बोधे करीत आहेत. (प्रतिनिधी)