Join us

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटकाळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहेत. त्यात गोदी कामगार, पोर्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकटकाळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहेत. त्यात गोदी कामगार, पोर्ट ट्रस्ट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आगामी काळात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने आपल्या कामगारांना त्याचा फटका बसू नये यासाठी कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी केले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा १०१ वा वर्धापन दिन सोमवारी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली माझगाव येथील कामगार सदन सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात जलोटा बोलत होते. या वेळी पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.