Join us

मोठ्या घरासाठी धरणे

By admin | Updated: April 8, 2016 02:05 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (डीआरपी) सेक्टर-१मधील चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे दिले

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (डीआरपी) सेक्टर-१मधील चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे दिले. सर्व रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.डीआरपीने या विभागांमधील रहिवाशांना पुनर्विकासाबाबत विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही हे आंदोलन छेडणाऱ्या डीआरपी सेक्टर-१ रहिवासी कृती संघाने केला आहे. रहिवाशांनी हरकती नोंदविल्यानंतरही त्याचा विचार होत नसल्याने रहिवाशांनी डीआरपी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याने आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचे संघाने सांगितले. आंदोलनानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी संघाच्या शिष्टमंडळाला भेट दिली. संघाच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन क्षत्रिय यांनी दिले. (प्रतिनिधी)