Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पार्किंगवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:05 IST

मुंबई : गिरगाव येथील शिक्कानगर परिसरात व्हीपी रोडवर खाद्यपदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. सदाशिव लेन कॉर्नरसमोर मोठ्या प्रमाणात दुचाकी ...

मुंबई : गिरगाव येथील शिक्कानगर परिसरात व्हीपी रोडवर खाद्यपदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. सदाशिव लेन कॉर्नरसमोर मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या केल्या जातात. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होते. त्यामुळे या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

.................................

घाटकाेपरमध्ये विना नंबरप्लेट गाडी धूळखात

मुंबई : घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावर पंखे शाह दर्गा येथे विना नंबरप्लेट गाडी धूळखात पडून आहे. त्याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही. ही भंगार गाडी हटविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

...................................

अर्धवट कामामुळे माझगावमध्ये वाहतूककाेंडी

मुंबई : माझगाव येथे नेसबीत रोडवर सेंट मार्याज शाळेजवळ १२ दिवसांपासून रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. दोन दिवसांत काम पूर्ण झाले, मात्र हा खड्डा जैसे थे आहे. त्यामुळे वाहतुकीला रस्ता अपुरा पडत असून, वाहतूककोंडी होत आहे. हा खड्डा लवकरात लवकर भरण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

............................