पनवेल : शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपाला येत असलेल्या खारघर शहरामध्ये हुक्का व मसाज पार्लर आणि अमली पदार्थ विक्र ीचा बाजार सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. खारघरमध्ये सुरू असलेल्या या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांच्याकडे केली आहे. खारघर सेक्टर - ११ प्राईम मॉल व सेक्टर - ८ भूमी हाईट्स येथे अशाप्रकारचा अनधिकृत हुक्का, मसाज पार्लर सुरू असल्याचा दावा खारघरमधील युवा सेनेने केला आहे. यापैकी प्राईम मॉलमध्ये फक्त दोनच दुकाने सुरू आहेत. मॉल बंद असूनही याठिकाणी ही दुकाने सुरू कशी आहेत? असा प्रश्न युवा सेनेचे शहर अधिकारी रोशन पवार यांनी उपस्थित केला. युवा सेनेचे कार्यकर्ते ग्राहक म्हणून या पार्लरमध्ये गेले असता या ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकाराची माहिती आम्हाला मिळाली असल्याचे युवा सेनेचे विभाग अधिकारी अवचित राऊत यांनी सांगितले. तसेच याठिकाणी अनैतिक प्रकारही सुरू असल्याचा आरोप युवा सेनेचे राऊत यांनी केला आहे. शहरामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक संस्था असून देशभरातून तरु ण वर्ग खारघरमध्ये शिक्षणासाठी शहरात येत आहेत. या अशाप्रकारच्या अवैध कामांमुळे तरु णवर्ग त्याकडे खेचला जाऊ शकतो व त्याचे दुष्परिणाम शैक्षणिक जीवनावर होऊ शकतात. यावेळी निवेदन देताना युवा सेनेचे विनोद पाटील, नरेश ढाले, अनिकेत पाटील, बंटी शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल तसेच या तक्र ारीत काही तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रि या खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
अनधिकृत हुक्का, मसाज पार्लरवर कारवाई करा
By admin | Updated: February 3, 2015 00:34 IST