Join us  

बोगस पीएचडीद्वारे विद्यापीठात पदोन्नती मिळवलेल्या कुलगुरुंसह इतरांवर कारवाई करा-  आ.डॉ.नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 5:43 PM

पुण्यातील औंध परिसरातील स्पायसर विद्यापीठांच्या कुलगुरूंचीच पीएचडी डिग्री बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई- महाराष्ट्र राज्य बनावट पीएचडी तसेच इतर बनावट डिग्रीचे प्रकार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. याच एक भाग पुण्यातील औंध परिसरातील स्पायसर विद्यापीठांच्या कुलगुरूंचीच पीएचडी डिग्री बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅडव्हेंटिस्ट टायडिंग्ज मॅगझीन व अ‍ॅडव्हेंटिजस्ट हॅरिटेस्ट या मासिकांमध्ये नोबल पिल्ले, चाको पॉल आणि जेयम यांना पीएचडी मिळाल्याचे वृत्त सामाजिक कार्यकर्ते अलमेडिया यांनी वाचले होते. यासंदर्भात त्यांनी स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी यांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याची माहिती मागितली होती. परंतु विद्यापीठाने आम्ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत येत नसल्याचे उत्तर दिले. सामाजिक कार्यकर्ते अलमेडिया याबाबत महितीकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या बनावट डिग्रीचा आधार घेत कुलगुरूने सन २०१० ते २०१३ या कालावधीत स्पायसर अँडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये पदोन्नती आणि आर्थिक फायदे घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत खा.उदयनराजे भोसले यांनी या प्रकाराबाबत मला पत्र देऊन लक्ष वेधले, असंही शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे म्हणाल्या आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अँलन अलमेडिया यांनी पुणे येथील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात १६ मे २०१८ रोजी कुलगुरूसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले, मुख्य वित्तीय अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला शाखेचे प्रमुख चाको पॉल, क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाऊंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे आणि या बनावट पदव्या मिळवून देणारा अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या युनीटने याचा तपास केला असता, पिल्ले, चाको पॉल आणि जयेम यांनी हिमाचल प्रदेशमधील भारती युनिवर्सीटी, लाडो सुलतानापूर येथून घेतल्याचे समोर आले. त्यांनी याच पीएचडीच्या जोरावर स्पायसर विद्यापीठात या तिघांनी पदोन्नतो मिळवली. या तिघांनी गोपाल खंदारे यांच्या मदतीने मानव भारती युनीवर्सीटीकडून बोगस पीएचडी मिळवली असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे एक पथक हिमाचलप्रदेशात जाऊन त्यांनी मानव भारती विद्यापीठात या पीएचडीसंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी या तिघांना पीएचडी दिलीच नसल्याचे समोर आले. त्यानुसार या पाच जणांवर स्पायसर विद्यपीठाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आपण यात तात्काळ स्पायसर अँडव्हेंटीस्ट युनिव्हर्सिटीवर प्रशासक नेमण्यात यावे, आरोपींवर कडक कारवाई करत विद्यापीठाचे बोगस डिग्री दाखवून आर्थिक नुकसान गेले आहे, त्याचे भरपाई करून घेण्यात यावी, अशा मागण्याही नीलम गो-हे यांनी राज्यपालांकडे केल्या आहेत. 

टॅग्स :नीलम गो-हे