Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरुग्राम येथील शाळेमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येसंदर्भात महापौरांच्या शाळेवर कारवाई करा-मनविसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:31 IST

गुरुग्राम येथील शाळेमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेनंतर, सोमवारी मनविसेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शाळेची भेट घेतली होती.

मुंबई : गुरुग्राम येथील शाळेमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेनंतर, सोमवारी मनविसेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शाळेची भेट घेतली होती. त्या वेळी तेथील सुरक्षेत गलथानपणा आढळून आल्याने, मंगळवारी मनविसेने महापौरांच्या राजे संभाजी विद्यालयाच्या सुरक्षेप्रश्नी कारवाई करण्यासाठी, महाडेश्वरांनाच निवेदन दिले. त्यामुळे आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.