Join us

सलमानविरोधात खोटे पुरावे देणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: April 16, 2015 01:50 IST

अभिनेता सलमान खानविरोधात खोटे पुरावे सादर करणाऱ्या पोलीस व रूग्णालय अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी बचाव पक्षाने सत्र न्यायालयात केली.

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधात खोटे पुरावे सादर करणाऱ्या पोलीस व रूग्णालय अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी बचाव पक्षाने सत्र न्यायालयात केली.सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी ही मागणी केली. सलमानला याप्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस व रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे सादर केले. खोटी साक्ष दिली. सलमानच गाडी चालवत होता, याचा एकही पुरावा सरकारी पक्षाने सादर केलेला नाही. सलमानच्या रक्ताचे नमुने तपासणारेही त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नव्हते. त्यामुळे न्यायालयाने खोटे पुरावे व साक्ष देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवदे यांनी केली.वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडल्याचा सलमानवर आरोप आहे. त्यात एकाचा बळी गेल्याने सलमानविरोधात सदोष मनुष्य वधाचा खटला सुरू आहे. (प्रतिनिधी)