Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिधोकादायक १७ इमारतींवर कारवाई

By admin | Updated: June 1, 2015 22:33 IST

मान्सूनच्या काळात होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा

ठाणे : मान्सूनच्या काळात होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा, असे आदेश दिले होते. परंतु, डेडलाइन संपली तरी शहरातील केवळ १० इमारतींवर हातोडा पडला असून ७ इमारती खाली करण्याची कारवाई केली आहे. आता मान्सून सुरू होण्यापूर्वी इमारती तोडल्या जातील, असे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी सर्व विभागांचा मान्सूनपूर्व आढावा घेतला होता. या वेळी, शहरातील अतिधोकादायक ५८ इमारतींवर ३१ मेपर्यंत कारवाई करा, असे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. (प्रतिनिधी)