Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तडीपार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:05 IST

मुंबई : शहरातून एका वर्षासाठी हद्दपार केले असतानाही बेकायदेशीररीत्या शहरात प्रवेश केलेल्या एका आरोपीला अखेर रफी अहमद किडवाई मार्ग ...

मुंबई : शहरातून एका वर्षासाठी हद्दपार केले असतानाही बेकायदेशीररीत्या शहरात प्रवेश केलेल्या एका आरोपीला अखेर रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान शेख (वय २९) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

.............................................

बँक खात्यातील रकमेवर डल्ला

मुंबई : भायखळ्यातील ४२ वर्षीय व्यक्तीचे डेबिट कार्ड क्लोन करून ठगाने त्यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपयावर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...........................................

पैशांच्या वादातून हत्या; भाच्याला बेड्या

मुंबई : वडिलोपार्जित घर विकून मिळणाऱ्या पैशांमध्ये वाटा देण्यास नकार दिल्याने भाच्यानेच महेंद्र लाड (वय ४२) यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चाैकशीअंती त्याला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत.

..........................................