Join us  

क्यूआर कोडची यंत्रणा रद्द करावी; राज्यपालांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:31 AM

मुंबई रेल प्रवासी संघाची मागणी

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट आणि पास यंत्रणा असताना पुन्हा क्यूआर कोडची नवीन यंत्रणा आणण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे नवीन यंत्रणा रद्द करावी किंवा जर नवीन यंत्रणा राबवायची असेल तर त्याची सोय रेल्वे स्टेशनवरच करण्यात यावी, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाने राज्यपालांकडे केली आहे.रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत मुंबई रेल प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने भाजपा महामंत्री आर.यु. सिंग यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधु कोटीयन, सेक्रेटरी कैलाश वर्मा, उपाध्यक्ष सिद्धेश देसाई, शैलजा सामंत, नंदू पावगी उपस्थित होते.मुंबई रेल प्रवासी संघ उपाध्यक्ष सिद्धेश देसाई म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना कोणी वालीच राहिलेला नाही. राज्य सरकारचे प्रशासन रोज नवे नवे नियम काढून रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाला गोंधळात घालण्याचे काम करत आहेत.ट्रान्स हार्बरमध्ये ऐरोली, घणसोली येथे ट्रेनचा थांबा देण्यात यावा, तसेच डोंबिवली ते कळवा धीम्या ट्रॅकवरून ठाणे ट्रेन चालवण्याची मागणी केलेली आहे. सध्या येथे राहणाऱ्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांना अतिशय खडतर प्रवास करावा लागत आहे. शासकीय आणि खासगी कंपन्यात शिफ्ट चालू करून गर्दीचे नियोजन करून जास्त ट्रेन्स चालवण्याची मागणी संघटनेने केलेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका भाजप उपाध्यक्ष आर. यु. सिंग आणि संघटनेचे सेक्रेटरी कैलास वर्मा यांनी मांडली. डॉक्टर, औषध कंपनीमधील कर्मचारी, खासगी बँक कर्मचारी यांना राज्य सरकारच्या जीआरमधून डावलण्यात आलेले आहे, त्यांनासुद्धा सामावून घेण्यात यावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे. फक्त सरकारी कर्मचाºयांपुरता स्वार्थी विचार सोडून आता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असे शैला सामंत म्हणाल्या.सद्यघडीला अतिशय कमी ट्रेन्स ट्रान्स हार्बर आणि कळवा, डोंबवली येथे स्लो ट्रॅकवर शून्य सेवा रेल्वे देत आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी रेल्वे सुरू करण्याची संघटनेची भूिमका आहे़

टॅग्स :मुंबई लोकल