Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहशालेय उपक्रमांत अभिवाचन स्पर्धा

By admin | Updated: September 1, 2015 01:29 IST

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळांच्या सहशालेय उपक्रमांत अभिवाचन स्पर्धांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घेतला आहे.

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळांच्या सहशालेय उपक्रमांत अभिवाचन स्पर्धांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घेतला आहे. यंदापासून शाळांच्या उपक्रमात अभिवाचनाचा समावेश केला जाईल.यासंदर्भातील मागणी शिक्षक परिषदेने केली होती. त्यावर शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सहशालेय उपक्रमांत शाळांमधील विद्यार्थी अभिवाचनाचा आनंद घेताना दिसतील. दरवर्षी होणाऱ्या सहशालेय उपक्रमांत वक्तृत्व, नृत्य, वेषभूषा, निबंध, एकपात्री प्रयोग, समूहगीत, शैक्षणिक साधने निर्मिती यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीसंदर्भातील कोणताही उपक्रम होत नाही. त्यामुळे अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी परिषदेने केल्याचा दावा अनिल बोरनारे यांनी केला आहे.बोरनारे म्हणाले की, शिक्षण कार्यालयाने मंजूर केलेल्या मागणीमुळे विद्यार्थी अभ्यासासोबतच शाळेच्या ग्रंथालयाकडे वळतील. स्पर्धेच्या निमित्ताने साहित्यिकांची दर्जेदार पुस्तके वाचल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाचन संस्कृतीचे संवर्धन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.