चार दिवसांत चार मृत्यूमुंबई : स्वाइन फ्लूमुळे गेल्या चार दिवसांत मुंबईत चार मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात इतकी झाली असून आतापर्यंत ७५४ रुग्ण आढळून आले आहेत. ७ मार्च रोजी मुंबईत स्वाइनचे ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३० पुरुष असून २२ महिला आहेत. मुंबईतील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईबाहेरून २ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत स्वाइनचा कहर
By admin | Updated: March 8, 2015 02:30 IST