Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून स्वाइनचा आढावा

By admin | Updated: March 13, 2015 01:09 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पोस्टर्स, बॅनर्स, हॅन्डबील व घराघरात जाऊन स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करुन आजार आटोक्यात आणावा अशा सूचना शनिवारी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पोस्टर्स, बॅनर्स, हॅन्डबील व घराघरात जाऊन स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करुन आजार आटोक्यात आणावा अशा सूचना शनिवारी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्र मांतर्गत जिल्हा आरोग्य मिशन समितीची सभा जिल्हा परिषद वर्तक सभागृहात आयोजिली होती.यावेळी त्यांनी ठाणे जिल्हयातील २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या खर्चाविषयक तसेच आरसीएच-२, एनआरएचएम डीशनॅलिटी व आर.आय अंतर्गत येणाऱ्या योजनांचा, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण योजना, अशा योजना, सिकललेस आजार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत योजना, प्रसूती, नियमीत लसीकरण आदी इत्यादी बाबत आढावा घेतला. स्वाइन फ्ल्यू बाबत जिल्हयातील परिस्थितीचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ८५ रु ग्ण स्वाइन फ्लूचे आढळून आले असून त्यातील ७० ठाणे शहरातील व १५ रुग्ण बाहेरील शहरातून आलेले आहेत.याप्रसंगी खासदार कपील पाटील, आमदार निरंजन डावखरे यांनी या आजारावर योग्य उपचार होण्यासाठी उपस्थित विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आमदार ज्योती कलानी यांनी उल्हासनगर शहरातील स्वाईन फ्ल्यू व तेथील उपचार पध्दतीबाबत न्यूरोलॉजिकल डॉक्टर्स नाही तसेच सोनोग्राफी मशीन उपलब्ध नाहीही बाब निदर्शनात आणून दिली़ (प्रतिनिधी)