Join us

राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच, स्वच्छाग्रहींची कार्यपद्धतीही नव्याने निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील २७ जिल्ह्यांमधील स्वच्छाग्रहींना तीन महिने म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेच्या प्रचार प्रसारासाठी स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली होती. हाताची स्वच्छता राखणे, खोकताना आणि शिंकताना घ्यावयाची काळजी, कुठेही थुंकण्याच्या सवयी, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर या विषयांची माहिती या स्वच्छाग्रहींच्या माध्यमातून ग्रामस्थांना दिली जाणार आहे. तर, स्वच्छतेबाबत चांगले काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींना प्रोत्साहनपर भत्ताही दिला जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आजच जारी करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिली.