Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: June 16, 2015 03:16 IST

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५वर्षीय महिला कल्याणमधील

कल्याण : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५वर्षीय महिला कल्याणमधील तिच्या राहत्या घरात रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मृतावस्थेत आढळली. हा प्रकार संशयास्पद असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.पश्चिमेतील खोजा जमाद खान सिल्व्हर जुबिली इमारतीत यास्मिन ही कुटुंबासमवेत राहायची. तिचा पती मोहदविन शेख हा रिक्षाचालक आहे.रविवारी रात्री तो घरी आला असता पत्नी जमिनीवर निपचित पडली होती. तिला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत असल्याचे घोषित केले. या ूची नोंद एमएफसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.