Join us

संशयित बोटीने खळबळ

By admin | Updated: September 19, 2015 02:46 IST

गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कडक सुरक्षा तैनात केली आहे. अशात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मढ बेटांवरील

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कडक सुरक्षा तैनात केली आहे. अशात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मढ बेटांवरील संशयित बोटीच्या वृत्ताने खळबळ उडाली. तपासाअंती ती बोट गुजरातच्या अ‍ॅक्वा कंपनीची असून बोटीचे गाळ व माती काढण्याचे पाते बिघडल्याने ती समुद्रात उभी असल्याचे समजले, आणि सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बोटीचे नाव ‘फ्लायड दहेज २७’ असे होते. यााबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी याबाबत खातरजमा करून घेतली.