Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओम पुरींच्या मृत्यूमागील कारणाबाबत संशय

By admin | Updated: January 8, 2017 03:39 IST

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यू मागील नेमक्या कारणाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू आला की बाथरुममध्ये

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यू मागील नेमक्या कारणाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू आला की बाथरुममध्ये पडल्याने डोक्याला मार बसल्यामुळे, असा सवाल त्यांच्या निकटवर्तीयाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत सोशल मीडियावरुन विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ओशिवरा पोलिसांनी मात्र या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून त्यांचे वाहनचालक, घरगडीकडे विचारणा करण्यात येणार आहे. ओम पुरी यांच्या नातेवाईकांसमवेत हे सर्वजण नाशिक येथे अंत्यसंस्कारासाठी गेले आहेत. तेथून परतल्यानंतर त्याचे जबाब नोंदविणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ओम पुरी यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच्या फ्लॅटमध्ये किचनरुम अवस्थेत आढळून आला होता. (प्रतिनिधी)