Join us

महावितरणच्या चार कर्मचा-यांचे निलंबन

By admin | Updated: February 11, 2015 22:40 IST

औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या विद्युत बिलात हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील

महाड : औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या विद्युत बिलात हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांवर अधिक्षक अभियंत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाईत उपकार्यकारी अभियंता ए. आर. नरवडेंचाही सहभाग असल्याचे गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर उके यांनी सांगितले. महाड औद्योगिक वसाहतीमधील चित्रा पेट्रोकेमिकल्स या कारखान्याचे या महिन्याचे बिल १० लाख रु. इतके आल्याने कारखाना व्यवस्थापनाने याबाबत तक्रार केली होती. या कारखान्याचे दर महिन्याचे बिल हे प्रत्यक्ष रीडिंगप्रमाणे न देता सरासरी बिल वितरणकडून देण्यात येत होते. गेली सहा महिने हा प्रकार सुरूच होता. याबाबत कारखाना व्यवस्थापक संदीप खोत यांनी कारखान्याचे बिल सरासरी न देता प्रत्यक्ष रीडिंगप्रमाणे देण्यात यावे, असे पत्र महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र पुन्हा तीन महिने सरासरी बिल देण्यात आले. हे नियमितपणे भरले जात असतानाच या महिन्यात १० लाखांचे बिल पाठविण्यात आले.