Join us

४२ हजार ‘तळीरामां’चे लायसन्स निलंबित

By admin | Updated: January 8, 2015 00:53 IST

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

७ वर्षांत मद्यपींकडून २२ कोटींची वसुली : पोलिसांच्या उपाययोजनेमुळे अपघातांत घटसुशांत मोरे -मुंबईमद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या मद्यपींच्या प्रतिबंधासाठीची वाहतूक पोलिसांची उपाययोजना यशस्वी ठरली आहे. ७ वर्षांमध्ये त्यांच्याकडून तब्बल २२ कोटी २ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला तर ४२ हजार ६११ ‘तळीराम’ चालकांचे लायसन्स निलंबित केले आहे. त्यात सरलेल्या वर्षातील २,९८९ जणांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अपघात व दुर्घटनेचे प्रमाण कमी होत आहे.यंदा नवीन वर्षाच्या स्वागतावेळी तळीराम चालकांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून चांगलीच ‘फिल्डिंग’ लावली होती. बार, परमिट रूम, हॉटेल मालक व व्यवस्थापकांनाच मद्यपींना घरपोच पोहोचविण्यासाठी सहकारी चालक देण्याची जबाबदारी सोपविली होती. तर वाहन तपासण्यासाठी शहर व उपनगरात ७० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी लावली. ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून नव्या वर्षाच्या पहाटेपर्यंत झालेल्या कारवाईत एकूण ५२३ तळीराम सापडले. १ जानेवारी २००८ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ प्रकारात एकूण दारू पिऊन वाहन चालविण्याच्या १ लाख ९ हजार ३१६ केसेस करण्यात आल्या. त्यातील ४२ हजार ६१६ चालकांचे लायसन्स न्यायालयाकडून निलंबित करण्यात आले, तर एकूण २२ कोटी २ लाख ९ हजार ७५० रुपये दंडात्मक कारवाईतून वाहतूक पोलीस विभागाला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत ५१ हजार ९७५ तळीराम चालकांना तुरुंगवास भोगावा लागला असून २0१४ मधील ४ हजार ३३३ चालकांचा समावेश आहे. ’ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’मध्ये वाहनचालक सापडल्यास पोलीस त्याच्याकडून दोन हजार रुपये अनामत रक्कम घेऊन दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याची सूचना करतात. त्याच्या शरीरातील दारूचे प्रमाण, यापूर्वी कारवाई झाली असेल तर त्यावरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी त्याच्याकडून दंड किंवा सहा महिन्यांसाठी लायसन्स रद्द करणे तसेच कारागृहात पाठविणे याबाबतचा निर्णय घेतला जातो. मद्यपी चालकांवरील कारवाईची सात वर्षांतील आकडेवारी वर्षएकूण केसेसतुरुंगवासएकूण दंडलायसन्स निलंबित२००८१६,४५०९,५५४३,२९,०००००८,२३७२००९१४,६८१११,४९९२,८६,०९,४००९,४८४२0१0१६,२९0१0,२६२३,१४,८७,९५0८,३५४२0१११६,३२४६,0९४३,५६,३८,७00६,0३७२0१२१४,१३३५,२६0३,२१,९७,२00४,0८८२0१३१५,८९७४,९७३२,७६,६0,५00३,४२२२0१४१५,५४१४,३३३३,१७,१६,000२,९८९वाहनचालकांवरील खटलेवाहनाचे प्रकारएकूण केसेसदुचाकी९,९२९चार चाकी४,९३४तीन चाकी३३२टेम्पो१८९ट्रक७५बस२९डंपर५३