Join us  

मोठी बातमी! सचिन वाझेला २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर पण कोठडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 8:04 PM

Sachin Waje News : खंडणी प्रकरणी निलंबित असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर झाला आहे.

मुंबई : खंडणी प्रकरणी निलंबित असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर झाला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या खंडणी प्रकरणात वाझेला जामीन मंजूर झाला आहे. व्यापारी विमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून वाझेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लक्षणीय बाब म्हणजे सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला असला तरी वाझेची कोठडी कायम राहणार आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन सचिन वाझेला दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

दरम्यान, कोरोना काळात वाझे आणि इतर काहींनी हॉटेल चालवण्यासाठी विमल अग्रवाल यांच्याकडे खंडणी मागितली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुंड रियाज भाटी, सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांचा एफआयआरमध्ये समावेश आहे. या प्रकरणी वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेलवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, परमबीर सिंग आणि रियाझ भाटी यांना अटक झाली नाही. अलीकडेच सुमित आणि अल्पेश यांना जामीन मिळाला होता. 

वाझेची कोठडी कायम

दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आज सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. त्याच्यावर चार गुन्हे दाखल असून २ प्रकरणांचा तपास सीबीआयकडे तर एका प्रकरणाचा तपास ईडीकडून आणि अँटिलिया समोर स्फोटक तसेच मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. खरं तर वाझेला दोन प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे. एका प्रकरणात तो माफीचा साक्षीदार आहे. पण, एनआयए कोर्टाने नुकताच त्याचा जामीन अर्ज फेटाळला. वाझेला ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. त्याच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला होता. विशेष बाब म्हणजे त्याला १८ नोव्हेंबर २०२२ रोजी जामीन मिळाला होता. पण, इतर प्रकरणात तो अटकेत असल्याकारणाने त्याची कोठडी कायम आहे. 

मागील वर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. ईडीने अशी भूमिका घेतल्यानंतर सीबीआयनेही वाझेला माफीचा साक्षीदार होण्याची अनुमती दिली होती. मात्र, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशमुख यांना जामीन मंजूर करतेवेळी उच्च न्यायालयाने वाझेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वाझेच्या निवेदनावर अवलंबून राहणे ‘सुरक्षित’ नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. दरम्यान, अँन्टिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी याच प्रकरणाशी संबंध असलेल्या मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाझे अद्यापही एनआयएच्या अटकेत आहे.  

टॅग्स :सचिन वाझे