Join us

प्रभारी सहायक उपायुक्त निलंबित

By admin | Updated: October 28, 2015 00:43 IST

महानगरपालिका आयुक्त सतिश लोखंडे यांनी कारवाईचा बडगा उगारत प्रभारी सहा. उपायुक्त सुधाकर संखे यांची गठडी वळली आहे.

वसई : महानगरपालिका आयुक्त सतिश लोखंडे यांनी कारवाईचा बडगा उगारत प्रभारी सहा. उपायुक्त सुधाकर संखे यांची गठडी वळली आहे. एका व्यापाऱ्याला स्थानिक संस्थाकर प्रकरणात मदत केल्याचा आरोप संखे यांच्यावर आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आयुक्तांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. अशीच एक कारवाई लवकरात लवकर एका अधिकाऱ्यावर होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. आयुक्तांनी आता अनधिकृत इमारती बांधणाऱ्या पण कागदपत्रावर कुठेही नसणाऱ्या नगरसेवकांची झाडाझडती सुरू करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. (प्रतिनिधी)