Join us
Daily Top 2Weekly Top 5

भालीवडी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

हा मृत्यू नैसर्गिक नसून तो संशयास्पद आहे, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यात भालीवडी येथे असलेल्या आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व मोग्रज येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू २० आॅगस्ट रोजी मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे. हा मृत्यू नैसर्गिक नसून तो संशयास्पद आहे, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. तालुक्यात भालीवडी येथे असलेली आदिवासी आश्रमशाळा फक्त मुलींसाठी आहे. तालुक्यातील मोग्रज गावातील देहू आगिवले यांची मुलगी जोत्स्ना ही इयत्ता सहावीत निवासी शिक्षण घेत होती. १८आॅगस्ट रोजी रात्री जोत्स्नाला रात्री एक वाजता उलटी झाली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजता तिला पुन्हा उलटी झाली. त्यानंतर तिला पहाटे साडेपाच वाजता उपचारासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुगणालयात आणण्यात आले. मात्र जोत्स्नाची परिस्थिती पाहून येथील उपजिल्हा रुग्णालयाने तिला पुढे पाठविण्याचा सल्ला दिला. जोत्स्नाला घेऊन वाशी येथील एमजीएम येथे आणले मात्र त्याठिकाणी तिला दाखल करु न घेण्यात आले नाही. त्यामुळे तिला मुंबई येथील केईएम येथे आणण्यात आले. मात्र २०आॅगस्ट रोजी तिचे निधन झाले. हा मृत्यू संशयास्पद आहे अशी तक्रार पालक करु लागले.