Join us

सुशांतसिंहच्या माजी अंगरक्षकाची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या आणि ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात अमली पदार्थ ...

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या आणि ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पुन्हा एकदा गती घेतली आहे. बुधवारी सुशांतसिंहच्या माजी सुरक्षारक्षकाची मालाड येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चाैकशी सुरू हाेती.

गेल्यावर्षी १४ जूनला सुशांतने वांद्रे येथील राहत्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. नशेच्या आहारी जाऊन त्याने हे कृत्य केले असून त्याला त्यासाठी कोणी प्रवृत्त केले,याचा तपास गेल्या वर्षभरापासून एनसीबी, सीबीआय व ईडी या केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहेत. त्यामध्ये एनसीबीने याप्रकरणी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह अनेक ड्रग्ज तस्करांना अटक केली. ५ दिवसांपूर्वी सुशांतचा मित्र आणि रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी याला हैदराबाद येथून अटक केली. त्यानंतर त्यांचे नोकर नीरज आणि केशव यांची सोमवारी कसून चौकशी केली. त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे,

दरम्यान, बुधवारी दुपारी माजी अंगरक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या मालाड येथील निवासस्थानी कसून चौकशी सुरू होती. सुशांतला ड्रग्ज कोण पुरवित होता, त्याचा त्यामध्ये किती सहभाग होता, याबद्दल विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

............................................