Join us  

अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:03 AM

सुशांत आणि अंकिताचा मित्र दिग्दर्शक संदीप सिंह याने आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. बॉलिवूडच्या सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह काही जणांवर त्याला आत्महत्येला भाग पाडल्याचे आरोप करण्यात आले. या सगळ्या घडामोडींवर आता सुशांत सिंग राजपूत वाचू शकला असता, त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला वाचवू शकली असती, अशी भावनिक पोस्ट सुशांतच्या मित्राने केली आहे. 

सुशांत आणि अंकिताचा मित्र दिग्दर्शक संदीप सिंह याने आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत. त्याने अंकिता लोखंडेच्या नावे ही पोस्ट लिहिली आहे. यामध्ये संदीप म्हणतो की, ''प्रिय अंकिता, जसजसे दिवस उलटत आहेत, तसा एकच विचार मनामध्ये येत आहे. आपण थोडा आणखी प्रयत्न केला असता तर सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलण्यापासून रोखू शकलो असतो. त्याला वाचवू शकलो असतो. जेव्हा तुम्ही दोघे वेगळे झालात, तेव्हा पासून नेहमी तू सुशांतच्या भल्यासाठी प्रार्थना केलीस. तुझे प्रेम खरे होते. तू आतासुद्धा तुझ्या घराच्या नेमप्लेटवरून सुशांतचे नाव हटविलेले नाहीस. आपण जेव्हा लोखंडवालामध्ये एकत्र राहत होतो, ते दिवस मला आठवतात. आपण एवढ्या साऱ्या आठवणी साठवल्या आहेत ज्या आठवल्यानंतर रडू कोसळते. 

वाईट परिस्थितीत सुशांतला साथ करणारी अंकिता तूच एकमेव होतीस. सुशांतच्या चेहऱ्यावर हसू आणत होतीस. आताही तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात असे वाटतेय. मला माहिती आहे की तूच सुशांतला वाचवू शकली असतीस. आपण स्वप्न पाहिल्याप्रमाणे तुम्हा दोघांचे लग्न झाले असते तर तुम्ही दोघे एकत्र राहिला असता. अशा वेळी तू नक्कीच सुशांतला वाचवू शकली असतीस. तू सुशांतची प्रेयसीच नाही, तर पत्नीही होतीस, त्याची चांगली मैत्रिणही होतीस, अशी भावनिक पोस्ट संदीपने केली आहे.  

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सुशांतच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिच्यासोबत संदीपही गेला होता. संदीपने सुशांत अंकितासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus: होम आयसोलेशनवरून केंद्र सरकारने राज्यांना झापले; नियम बदलले...

भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक

आजचे राशीभविष्य - 20 जून 2020; मिथुन राशीच्या लोकांना आजार, अपघाताची शक्यता

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे