Join us

सुशांतला ड्रग्ज पुरविणाऱ्या तस्करला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पोहोचविणारा तस्कर हरीश खानला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पोहोचविणारा तस्कर हरीश खानला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी अटक केली. त्याच्याकडून नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एनसीबीने वांद्रेमधून त्याला व त्याचा भाऊ शाकिब खानलाही अटक करण्यात आली. त्याच्यावर १९ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, एनसीबीने त्यांना वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले.

एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते, त्यांची कसून चौकशी केली. चौकशीनंतर हरीश खानचे नाव समोर आले. हा तोच ड्रग पेडलर आहे, ज्याच्याकडून सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहोचविले जात होते.

हरीश भाऊ शकीब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा व्यापार करत होता. हरीशचे दाऊद इब्राहिमसारखे बनायचे स्वप्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.