अंधेरी: धोकादायक बीच अशी ओळख असलेल्या मालाड(प.)येथील अक्सा बीचवर बुडणार्या १२ वर्षीय मुलाला जीवरक्षकांनी वाचविले आहे. दुपारी सव्वा चारच्या सुमारास मालवणी गेट क्र ७ येथील आशीर्वाद चाळीत राहात असलेला मोहम्मद रिजवान (१२) हा पाण्यात गेला असतांना तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब लगेचच जीवरक्षक मोहन एरंडे, नथूराम सूर्यवंशी, प्रीतम चव्हाण, सचिन मुळीक, समीर कोळी आणि सिव्हील डिफेन्सचे जवान विनोद जयस्वाल, राजेश मिश्रा यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच पाण्यात उड्या घेत बुडणार्या मोहम्मद रिजवानला सुखरूप बाहेर काढून त्याला जीवदान दिले. रिजवानला लगेचच मालवणी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रिजवानच्या पालकांनी जीवरक्षकांचा गौरव करून त्यांना धन्यवाद दिले आहेत
अक्सा बीचवर जीवरक्षकांनी मुलाला वाचवले
By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST