लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाचा आनंद घेण्यासाठी बीचवर आलेल्या चार पर्यटकांना, दोन वेगवेगळ्या ठिकाणी जीवरक्षकांनी जीवदान दिल्याच्या घटना सोमवारी निदर्शनास आल्या आहेत. जुहू बीच आणि गोराई बीचवर या दोन्ही घटना घडल्या असून, चारही पर्यटक सुखरूप आहेत.जुहू बीचवर आलेल्या गोवंडी येथील निरजा जाहद आणि मुक्तार शेख हे दोन पर्यटक समुद्रात बुडत असल्याचे जीवरक्षकांच्या निदर्शनास आले. त्या वेळी किरण गोसावी, संदीप मोरे, सोहिल, सर्वेश या चार जीवरक्षकांनी समुद्रात उड्या घेत, दोघांची सुखरूप सुटका केली, तर गोराई येथे घडलेल्या दुसऱ्या दुर्घटनेत बीचवर सेल्फी काढताना, पुनित सोनी हा तरुण मैत्रिणीसोबत पाण्यात पडला. त्या दोहोंना जीवरक्षक गजानन कुराडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले.
बीचवर बुडणाऱ्यांना चौघांना वाचविले!
By admin | Updated: July 4, 2017 07:31 IST