मुंबई : दरवर्षीप्रमाणे शहरातील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण म्हाडा लवकरच हाती घेणार आहे. २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत म्हाडा हे सर्वेक्षण करणार असून, धोकादायक इमारतींतील रहिवाशांना तत्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.शहरात म्हाडाच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या हजारो उपकरप्राप्त इमारती आहेत. पावळ्यापूर्वी या इमारतींचा सर्व्हे म्हाडा करते. या सर्व्हेनंतर एप्रिल महिनाअखेर म्हाडाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यानंतर अतिधोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना तत्काळ स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्यात येतात. गतवर्षी म्हाडाने ८ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या.या वर्षी २३ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांना बराच वेळ मिळणार आहे. परंतु उपकरप्राप्त इमारतीमधून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी कित्येक वर्षे जातात. यापूर्वी संक्रमण शिबिरांमध्ये पाठविण्यात आलेले रहिवासी अद्यापही संक्रमण शिबिरामध्ये खितपत पडले आहेत. (प्रतिनिधी)
उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून
By admin | Updated: February 15, 2015 00:15 IST