मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांचा पालिकेने केलेला सव्र्हे हा मार्गदर्शक तत्त्वांनुसार झालेला नाही. त्यामुळे पालिकेने केलेल्या सव्र्हे बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत त्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी वांद्रे येथील कम्युनिटी हॉलमध्ये फेरीवाल्यांची राज्यव्यापी परिषद पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राव म्हणाले, ‘आयुक्तांना सव्र्हे करण्याचा अधिकारच नाही. फेरीवाला अधिनियम 2क्14 नुसार सव्र्हे करून परवाने देण्याचा अधिकार हा फेरीवाला शहर नियोजन समितीला देण्यात आला आहे.
मात्र आयुक्त त्यांच्या मर्जीने सव्र्हे करीत आहेत. सव्र्हे करण्याआधी त्यास न्यायालयात आव्हान देता येत
नाही. त्यामुळे युनियन गुन्हा
घडण्याच्या प्रतीक्षेत होती. 18 ते 23 जुलैदरम्यान पालिकेने केलेल्या
सव्र्हेत 25 टक्के फेरीवाल्यांचाही सव्र्हे झाला नाही. या वेळी पालिका अधिकारी आणि राजकीय पक्षांनी केलेल्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे युनियनने जमा केले आहेत. ते लवकरच न्यायालयात सादर करण्यात येतील.’
दरम्यान, पालिकेने फेरीवाल्यांच्या केलेल्या बेकायदेशीर सव्र्हेला आव्हान देताना संघटना स्वतंत्र सव्र्हे करणार असल्याचे राव यांनी सांगितले. त्यासाठी 8 ऑगस्टला फेरीवाला प्रतिनिधींची एक गुप्त बैठक होणार आहे. त्यात मुंबईतील 24 वॉर्डमध्ये कार्यरत युनियनचे वॉर्ड अध्यक्ष आणि युनियनचे उपाध्यक्ष सामील होतील. बैठकीत त्यांना फेरीवाल्यांचा कायदेशीर सव्र्हे कसा करायचा, याची माहिती देण्यात येईल.
शिवसेनेची दादागिरी
पालिकेने केलेल्या सव्र्हेत शिवसेनेच्या स्थानिक प्रतिनिधींनी दादागिरी केल्याच्या तक्रारी फेरीवाल्यांनी केल्याचे राव यांनी सांगितले. जुन्या फेरीवाल्यांना मारहाण करून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यानी त्यांची माणसे बसवल्याचा आरोप राव यांनी केला.
काँग्रेसची फेरीवाली नगरसेविका
सव्र्हेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेविकेने स्वत: फेरीवाला म्हणून नोंद केल्याचा आरोप राव यांनी केला. आश्चर्याची बाब म्हणजे कुलाबा येथील या नगरसेविकेने स्वत:च्या आई-वडिलांचीही नोंद फेरीवाला म्हणून केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
2क् ऑगस्टला जंतरमंतरवर धरणो
केंद्राने केलेल्या फेरीवाला कायद्याला बगल देत पालिका आयुक्त स्वत:ची मनमानी करीत असल्याने नॅशनल फेरीवाला हॉकर्स युनियनतर्फे 2क् ऑगस्टला दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणो आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी मुंबईतील गैरकारभाराचे पुरावे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना देणार असल्याचे राव यांनी सांगितले.