Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा - हिंदू महासभा

By admin | Updated: May 3, 2017 04:08 IST

भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानला ताबडतोब उत्तर द्या. पाकिस्तानविरोधात सर्जिकल

मुंबई : भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानला ताबडतोब उत्तर द्या. पाकिस्तानविरोधात सर्जिकल अ‍ॅटॅक करावेत आणि त्यांची लष्करी ठाणी उद्ध्वस्त करावीत, अशी मागणी हिंदू महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.नोटाबंदी, परदेशी करारातून नव्हे, तर दहशतवादाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. सीमेवरील घुसखोरी ही नेहमीची डोकेदुखी असून, त्याला आपले जवान बळी पडत आहेत. फुटीरतवाद्यांना विकासाशी काहीही देणे-घेणे नाही, त्यामुळे त्यांना गोंजारत न बसता धडा शिकवला पाहिजे. याबाबत, पूर्वीच्या सरकारचे नाकर्तेपणाच्या धोरण भाजपादेखील पुढे चालवत आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळे जनतेत अस्वस्थता आहे, असा आरोप हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अनुप केणी यांनी केला. (प्रतिनिधी)