Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही माेतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही माेतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. हा आयुष्य बदलणारा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

‘...आणि दुसरीदेखील चांगली पार पडली... बरा होतोय. आता सर्व ठीक आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानातील चमत्कार आणि डॉक्टरांचे कौशल्य... आयुष्य बदलणारा अनुभव... तुम्ही आता ते पाहू शकता जे आधी पाहणे कठीण होते... अर्थातच सुंदर जग!’ असे ट्वीट त्यांनी केले.

‘अद्भुत जग... आतापर्यंत काय चुकलेय ते पाहण्यासाठी... रंग, आकार... एक आयुष्य बदलणारा अनुभव...’ असे म्हणत त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. याशिवाय चाहते आणि हितचिंतकांचेही आभार मानले. या शस्त्रक्रियेला उशीर झाल्यास अंधत्व येऊ शकले असते. त्यामुळे एक सल्ला आहे, खूप उशीर होण्यापूर्वी उपचार घेणे योग्य, असा सल्लाही बीग बींनी दिला. यापूर्वी फेब्रुवारीत त्यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. बिग बींनी सोशल मीडियावरून त्या शस्त्रक्रियेबद्दलही चाहत्यांना माहिती दिली होती.

...................................