मुंबई: ज्येष्ठ शिवसैनिक, ठाकरे घराण्याशी घनिष्ठ संबंध असलेले सुरेश तोडणकर (64) यांचे गुरूवारी संध्याकाळी अपघाती निधन झाले. मुलुंड येथे रूळ ओलांडताना त्यांना लोकलची धडक बसली.
तोडणकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. राजकीय अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. मुलुंड पूर्वेकड़ील वामनराव मुरांजन शाळेचे विश्वस्त होते. सामजिक शैक्षणिक क्षेत्रत त्यांचे मोलाचे योगदान होते. केसरबागमध्ये ते वास्तव्यास होते. रूळ ओलांडताना त्यांना लोकलने धडक दिली. या अपघातात गंभीर िजखमी झालेल्या तोडणकर यांना पालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठविला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प}ी व बहिणीलाही आजारपणाने ग्रासले होते. यामुळे ते अस्वस्थ होते. याच अस्वस्थेतून त्यांनी आत्महत्या केली नाही ना, अशी शंका व्यक्त होते आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)