Join us

अपना बाजारचे सुरेश तावडे अनंतात विलिन

By admin | Updated: August 2, 2015 23:31 IST

अपना बाजारचे सुरेश तावडे अनंतात विलिन

अपना बाजारचे सुरेश तावडे अनंतात विलिन
मुंबई - अपना बँक तसेच अपना बाजाराचे सर्वेसर्वा सुरेश तावडे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. ७२ वर्षाचे असलेले तावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही संस्थांच्या जडणघडणीत तावडे यांचे योगदान मोलाचे होते. मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर्स फेडरेशनचे संचालक म्हणून काम पाहताना अपना बाजारचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शनिवारी भोईवाडा येथील स्मशानभूमीत तावडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अपना बाजार आणि अपना बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी हजर होते.