Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघांना केला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:28 IST

काहीच आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांची जामिनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी विशेष एनएआयए न्यायालयाने याच बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी व सुधाकर द्विवेदी यांची जामिनावर सुटका केली.

मुंबई : काहीच आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांची जामिनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी विशेष एनएआयए न्यायालयाने याच बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी व सुधाकर द्विवेदी यांची जामिनावर सुटका केली.बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत अन्य आरोपींसह सुधाकर द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदीही उपस्थित होते, असा आरोप एनआयएने केला आहे. मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्या. एस. डी. टेकाळे यांनी या दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला.बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना काहीच आठवड्यांपूर्वी जामिन मिळाला. साध्वीचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला तर गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांचा जामीन मंजूर केला. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी मशिदीबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.>तात्पुरता दिलासाबॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना काहीच आठवड्यांपूर्वीजामिन मिळाला आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.