Join us

'आधार'विना महिला निराधार

By admin | Updated: May 6, 2015 01:41 IST

सरकारच्या आधारकार्ड योजनेसाठी अनेकांनी अर्ज करूनही त्यांना आधारकार्ड मिळालेली नाहीत. तर काहींची नावे त्यावर चुकीची छापण्यात आली आहेत.

टोकावडे : सरकारच्या आधारकार्ड योजनेसाठी अनेकांनी अर्ज करूनही त्यांना आधारकार्ड मिळालेली नाहीत. तर काहींची नावे त्यावर चुकीची छापण्यात आली आहेत. असे असतानाही महिलांच्या काही सरकारी योजनेत आधारकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे सरकारने या योजनांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. तसेच या योजनाच सरकारला बंद करायच्या असल्याने अशा जाचक अटी सरकारने मुद्दाम लादल्याचा अरोपही महिलांनी केला आहे. सरकारी योजनेत अनिवार्य केलेल्या आधारकार्डामुळे महिलांची स्थिती आधारा शिवाय निराधार अशीच झाली आहे. शासकीय धान्य योजनेत महिलांना कुटुंब प्रमुखाची जबाबदारी देऊन तिला सशक्त बनविण्यासाठी शासनाकडून धान्यावर मिळणारी सबसिडी ही संबंधित महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आणि हे बँक खाते आधार कार्डाशी जोडले जाणार आहे. परंतू गावोगावी असलेले आधारकार्ड बनविण्याचे कॅम्प बंद केल्याने तसेच अर्ज करूनही आधार कार्ड न मिळाल्याने समस्त महिलावर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)