Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर-पूर्व मध्ये सपाचा महाविकास आघाडीला पाठींबा; पाठिंब्याचे अधिकृत पत्रक जारी

By जयंत होवाळ | Updated: April 25, 2024 20:08 IST

त्यामुळे पाटील यांचा बळकटी मिळाली आहे. पाठिंब्याचे अधिकृत पत्रक समाजवादी पक्षाने गुरुवारी जारी केले.

मुंबई : महाविकास आघाडीचे उत्तर-पूर्व मतदारसंघातील उमेदवार संजय पाटील यांना समाजवादी पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे पाटील यांचा बळकटी मिळाली आहे. पाठिंब्याचे अधिकृत पत्रक समाजवादी पक्षाने गुरुवारी जारी केले.

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष इंडिया आघाडी  सोबत असून सांप्रदायिक शक्तीला व हुकुमशाहीला बाजूला सारून देशात संविधान वाचवणे, एका अर्थाने लोकशाहीला वाचवणे हे आमचे उदिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजवादी पक्ष मुंबई प्रदेशातील इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपणही निवडणुकीला उभे  आहात. आपल्याला निवडून आणण्याकरिता तुमच्या विभागातील आमचे सर्व स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास पूर्ण ताकदीने समर्थन करणार आहेत. तरी आपणास निवेदन आहे की  तुमच्या विभागातील समाजवादी पक्षाच्या पदाधिकार्यांसोबत  बैठक आयोजित करावी, असे पाठिंब्याच्या पत्रात म्हटले आहे.