Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदतीसाठी आधार सातबाराला जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 06:03 IST

दुष्काळ मदतीचे वाटप सुव्यवस्थित व्हावे यासाठी शेतकºयांचा आधार क्रमांक त्यांच्या सात- बारा उताºयाला जोडावा म्हणजे थेट बँकेत मदत जमा करणे शक्य होईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे दिले.

मुंबई : दुष्काळ मदतीचे वाटप सुव्यवस्थित व्हावे यासाठी शेतकºयांचा आधार क्रमांक त्यांच्या सात- बारा उताºयाला जोडावा म्हणजे थेट बँकेत मदत जमा करणे शक्य होईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे दिले.दुष्काळ व्यवस्थापनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व्हेक्षणांतर्गत पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर करता येईल. काही जिल्ह्यातील मोठ्या धरणात इतर जिल्ह्यात झालेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणीसाठा समाधानकारक वाटतो. मात्र प्रत्यक्षात पाणीसाठा अधिक असलेल्या जिल्ह्यात पाऊस कमी असतो. अशा जिल्ह्यात जमिनीतील पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन दुष्काळाच्या अनुषंगाने कार्यवाही करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.