Join us  

पूर्व उपनगरात गढूळ पाण्याचा पुरवठा!, पाणी उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:12 AM

घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २चे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. सदर जलाशय ७ मेपासून कार्यान्वित होईल. परिणामी, ७ मेपासून १४ मेपर्यंत एल, एन वॉर्डमधील नागरिकांनी पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले.

मुंबई  - घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २चे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. सदर जलाशय ७ मेपासून कार्यान्वित होईल. परिणामी, ७ मेपासून १४ मेपर्यंत एल, एन वॉर्डमधील नागरिकांनी पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले.एल विभागातील प्रभाग क्रमांक १५७ ते १६१ व १६४ मधील संघर्षनगर, खैराणी रोड, सरदार कपाउंड डिसुझा कंपाउंड, अयप्पा मंदिर मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर मार्ग, यादवनगर, राजीवनगर, भानुशालीवाडी, कुलकर्णी वाडी, लोयल्का कंपाउंड, सुभाषनगर, बारदान गल्ली, इंदिरानगर, मोहिली पाइपलाइन, परेरावाडी, गणेशनगर, नारायणनगर, नारी सेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकरनगर/ साने गुरुजीनगर आदी ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होईल.एन विभागातील प्रभाग क्रमांक १२३ ते १२७ आणि १३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, रामनगर, हनुमान मंदिर, राहुलनगर, कैलासनगर, संजय गांधीनगर, वर्षानगर, खंडोबा टेकडी, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टँक, डी आणि सी मनपा वसाहत, इंदिरानगर २, गंगावाडी गेटनगर २ विक्रोळी पार्क साइटचा अंशत: भाग, सिद्धार्थनगर, साईनाथनगर, रोहिदास रोड आदी ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका