Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकारी रुग्णालयांतील शस्त्रक्रियेच्या उपकरणांचा पुरवठा १ आॅक्टोबरपासून बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 05:49 IST

राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत शस्त्रक्रिया उपकरणांचा पुरवठा आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो.

मुंबई : राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत शस्त्रक्रिया उपकरणांचा पुरवठा आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो. मात्र ९० कोटींहून अधिक थकीत निधी पुरवठादारांना दिला नसल्याने येत्या दहा दिवसांत निधी न दिल्यास १ आॅक्टोबरपासून सदर महाविद्यालयांत या शस्त्रक्रियेच्या उपकरणांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे.वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांना आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनने याविषयी पत्र लिहिले. सातत्याने पाठपुरावा करीत १७ जुलैला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने याविषयी परिपत्रक काढत त्वरित थकीत निधी देण्याचे आदेश दिले. मात्र अद्याप याची अंंमलबजावणी न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.