Join us

सुपर मॉम, स्मार्ट किड्स स्पर्धा

By admin | Updated: November 10, 2016 03:59 IST

कुटुंबामध्ये आईचे स्थान महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असते. आई आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. भावनिक नात्याने ती अधिकच मुलांशी जोडलेली असते

मुंबई : कुटुंबामध्ये आईचे स्थान महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असते. आई आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. भावनिक नात्याने ती अधिकच मुलांशी जोडलेली असते. नेमके हेच नाते उलगडणारा एक कार्यक्रम ‘लोकमत’ सखी मंच आणि ‘झी टीव्ही‘ घेऊन येत आहेत. कारण सखी ही गृहिणी, आई, मुलगी, बहीण इ. भूमिका पार पाडत असते. आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट आले, तरी आपल्या कुटुंबाला निडरपणे वाचवित असते. लहान मुलांकरीता स्केचिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात १२ नोव्हेंबरला सायं. ४ वाजता होणार आहे. सुपर मॉम, स्मार्ट किड्स आई आणि मुलांच्या नात्यातले विविध पैलू या निमित्ताने बघायला मिळणार आहेत. चार फेऱ्यांमधून ही स्पर्धा होईल. यात स्वपरिचय फेरी, ज्यात आईने मुलाचा परिचय करून द्यायचा आहे, तर मुलाने आईचा. दुसरी फेरी म्हणजे कलाविष्कार फेरी यात दोघांनी मिळून कुठलीही कला प्रस्तुत करायची, जसे नृत्य, अभिनय मिमिक्री, गायन, वादन अथवा कोणतीही कला. तिसरी फेरी म्हणजे, ‘दिल तो बच्चा है जी...’ यात आईने लहान दिसायचे आहे. चौथी फेरी असेल, परीक्षक फेरी यात परीक्षकांकडून प्रश्न विचारण्यात येतील. अशा चार स्वरूपात आई मुलाच्या नात्यातला हळुवारपणा, असलेली जवळीकता एकमेकांना समजून घेण्याची कला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आईच्या वयाला मर्यादा नाही, पण मुला/मुलीचे वय ५ ते १५ वयोगटात असावे. स्पर्धा नि:शुल्क असून, ‘लोकमत’ कार्यालयात जाऊन प्रवेशपत्र भरणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कार्यक्रम बघायला आलेल्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ड्राइंगशिट व पेन्सील ‘लोकमत’कडून पुरवले जाईल. सर्व सखी हा कार्यक्रम बघण्याकरिता व स्पर्धेकरिता सादर आमंत्रित आहेत.झी टीव्ही तर्फे ‘ब्रह्मराक्षस’ ही नवीन मालिका ६ आॅगस्टपासून सुरू झालेली आहे. ही मालिका शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होते. बालाजी टेलीफिल्म्सच्या या मालिकेत अहम शर्मा, रक्षंदा खान, किश्वर मर्चंट आणि क्रिस्टल डिसूझा यांनी पार पाडली आहे. रहस्य रोमांच आणि थरारक, तसेच उपयुक्त कलेने सजलेली ही मालिका प्रेक्षकांना फार आवडत आहे. ‘ब्रह्मराक्षस’ ही अशा तरुण युवती रैनाची गोष्ट आहे. जी मुंबईहून एका लग्नात सहभागी होण्याकरिता कमलापूरला येते. तिथे रैना व रिषभ आपल्या एका प्रिय व्यक्तीला गमावतात, जी ‘ब्रह्मराक्षस’च्या आहारी गेलेली असते. ‘ब्रह्मराक्षस’ हा नवीन वधूंना म्हणजे, नवविवाहित युवतीला तिचे कुंकू, चुडा व पैंजण पाहून आक्रमक होत असतो. या ‘ब्रह्मराक्षस’चा पर्दाफाश करण्यासाठी एक योजना आखतात व त्या योजनेदरम्यान ते दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात. (प्रतिनिधी)