ठाणे: एकेकाळी पोर्न स्टार म्हणून नावाजलेल्या सनी लिआॅनच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात काही महिलांनी तक्रार नोंदविली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे मांडण्यासाठी तिने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल विभागात हजेरी लावली. अर्थात, पूर्वी जरी ‘तशा’ चित्रपटांमध्ये काम केले असले तरी आता मात्र मी ‘ते’ काम करीत नसल्याचा खुलासा तिने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये केला आहे.२तिच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्याबाबतचा खुलासा करण्याची नोटीस सायबर सेलने तिला बजावली होती. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी ती बुधवारी दुपारी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या कार्यालयात पोहोचली. साधारण दुपारी २.३० ते ३.३० या एक तासाच्या काळात तिच्या नेटवरील संकेतस्थळांबाबत मणेरे यांच्यासह सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी चौकशी केली. इंटरनेटवर तसेच अनेक संकेतस्थळांवर तिचे अश्लील व्हिडीओ तसेच छायाचित्रे झळकत आहेत. याबाबत अस्खलित इंग्रजीत म्हणणे मांडल्यानंतर लेखी स्वरूपातही तिने आपली बाजू मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचे ते सर्व चित्रीकरण आहे. भारतात आल्यानंतर मात्र आपण इकडच्या नियमांचे पालन करीत असल्याजे तिने सांगितले.
सनी म्हणते... आता 'ते' काम करत नाही
By admin | Updated: May 28, 2015 09:08 IST