Join us

महाडच्या नगराध्यक्षपदी सुनील कविस्कर

By admin | Updated: July 6, 2015 22:37 IST

महाड नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षपदी सुनील कविस्कर, उपनगराध्यक्षपदी

महाड : महाड नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षपदी सुनील कविस्कर, उपनगराध्यक्षपदी सुदेश कलमकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी सुषमा सातपुते यांनी जाहीर केले.महाडकर नागरिकांना आपला मागील नगराध्यक्षपदाचा कार्यकाल अजूनही स्मरणात असून त्याच पद्धतीने या वेळीही शहरातील समस्या दूर करण्यासाठी काम करू असे सुनील कविस्कर यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी पालिकेसंदर्भात कोणतेही वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी आपली मते जाणून घेतल्यास त्या समस्येचा पाठपुरावा करून पूर्तता करणे शक्य होईल असे कविस्कर म्हणाले. तर उपाध्यक्ष सुदेश कलमकर यांनी शिक्षण सभापती म्हणून शहराला भूषणावह ठरेल असे काम नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडून असा विश्वास व्यक्त केला. सुनील कविस्कर यांची नगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आपला आनंद साजरा केला. (वार्ताहर)