Join us  

येत्या रविवारी रात्री खगोलप्रेमींना ‘सुपरमून’ पाहण्याची पर्वणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:11 AM

येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे.

मुंबई : येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे.दा.कृ. सोमण म्हणाले की, पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु या वेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. ‘सुपरमून योगा’वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते. सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम ‘सुपरमून’ असे नाव दिले. रविवार ३ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल. त्या वेळी चंद्रबिंब नेहमीपेक्षा जास्त मोठे व तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतात रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्व आकाशात सर्वांना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शनघेता येईल. सुपरमूनचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांना ही एक पर्वणी असेल.यापूर्वी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते. आता यानंतर नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवार १ जानेवारी२०१८ रोजी पौष पौर्णिमेच्या रात्री ‘सुपरमून’चे दर्शन होईल. त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.‘सुपरमून’ म्हणजे काय?पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळआला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते.‘सुपरमून’वेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षासुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते.सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनीपौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम ‘सुपरमून’ असे नाव दिले.

टॅग्स :पृथ्वीबातम्या