Join us  

संडे हटके बातमी... नेत्रहीनांनी उमटवले नैसर्गिक वाद्यांतून राष्ट्रगीताचे सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 3:20 AM

३६ विविध नैसर्गिक वाद्यांतून निर्माण केलेल्या संगीतावर ‘जन गण मन’ची रचना लयबद्ध पद्धतीने करण्याचे त्याने ठरविले.

- सीमा महांगडेमुंबई : संकटांच्या अंधारावर जिद्दीच्या प्रकाशाने मात करायची असते अन् पर्यावरणाची काळजी घेत देशभक्ती हिंसक नव्हे तर अहिंसक मार्गाने जागवायची असते. त्यासाठी वाद्याचे सुमधुर सूरही पुरेसे ठरतात, याची जाणीव करून दिली ती चार दृष्टिहीन तरुणांनी. नैसर्गिक वाद्यातून ‘जन गण मन’चे सूर आळवत तरुणाईतील देशाभिमान जागवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आयुष्यात अंधार असतानाही दगड, नारळ, करवंट्या, झाडू, सूप, धान्य, पाटा, वरवंटा यांसारख्या वस्तूंच्या साहाय्याने तालबद्ध राष्ट्रगीताची लयबद्ध रचना सादर करून डोळस असूनही चुकीच्या दिशेने भरकटत जाणाऱ्या तरुणाईला देशभक्तीचाच संदेश प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देण्याचा प्रयत्न श्रीरंग संस्था आणि चार दृष्टिहीन तरुण करीत आहेत, असे कार्यक्रमाचे आयोजक सुमीत पाटील यांनी सांगितले.तरुणाईतील देशाभिमान अहिंसक मार्गाने जागवला जावा, तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, असे सुमीतला वाटत होते.

यासाठी त्याला वाद्यांनी मदत केली. ३६ विविध नैसर्गिक वाद्यांतून निर्माण केलेल्या संगीतावर ‘जन गण मन’ची रचना लयबद्ध पद्धतीने करण्याचे त्याने ठरविले. त्याला यासाठी मनश्री सोमण, योगिता तांबे तसेच भावंडे असलेल्या प्रशांत व जयेश बनिया या चार दृष्टिहीन तरुणांनी मदत केली. कुणी संगीत शिक्षक, कुणी बँकेत नोकरी करणारे, कुणी संगीत विशारद आहे. संगीताचे क्लासेस घेणारे हे चौघेही तरुणाईला आपल्या कार्यातून देशाभिमान, कष्टातून मिळणाºया यशदायी फळाची जाणीव करून देऊ इच्छितात.

तब्बल महिनाभर चाललेल्या या रेकॉर्डिंगसाठी त्यांनी विविध प्रकारे मेहनत घेऊन विविध ३६ वाद्यांतून लयबद्ध संगीताची निर्मिती केली आहे. यामुळेच फ्रेम मी मीडियाने या ‘जन गण मन’चे अधिकृत अनावरण स्वत:च्या संस्थेमार्फत करून याला अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थेचे भरत शिंदे यांनी सांगितले. यापुढे जाऊन मुक्ता आटर््समार्फत त्यांच्या १००० हून अधिक थिएटर्स आणि १०० हून अधिक मल्टिप्लेक्सेसमध्ये २४ जानेवारीपासून ‘जन गण मन’चे सादरीकरण सुरू झाल्याचे सुमीतने सांगितले.राष्ट्रीय संपत्तीची हानी करून राष्टÑभक्त होता येत नाहीराष्ट्रीय संपत्तीची हानी करून कोणीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही. देशभक्तीचा वारसा अशा अहिंसक माध्यमातून जोपासल्याने आपण खरे देशभक्त ठरू, असे मत राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त मनश्रीने व्यक्त केले. तर, तरुणांना अहिंसक मार्गाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील मेहनत, जिद्द, चिकाटी, देशाभिमानाची सकारात्मक दृष्टी जगाला कशी देता येईल हाच आमचा प्रयत्न असल्याचे सुमीतने संगितले.राष्टÑगीताला वाद्यांतून दिलेली मानवंदना आमच्यासाठी अभिमानास्पद!मनश्री सोमण, योगिता तांबे तसेच भावंडे असलेले प्रशांत व जयेश बनिया यांनी नैसर्गिक वाद्यांतून देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला आहे. आपला राष्ट्रध्वज किंवा आपले राष्टÑगीत म्हणजे आपली अस्मिता आहे. त्याला सुमधुर वाद्यांच्या माध्यमातून मानवंदना देणे म्हणजे आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जयेश बनिया याने दिली.

टॅग्स :मुंबई